Showing posts with label सामान्य विज्ञान. Show all posts
Showing posts with label सामान्य विज्ञान. Show all posts

October 17, 2022

तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक का ठेवत नाहीत ?



जिज्ञासा - 

तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक का ठेवत नाहीत ?

तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक ठेवल्यास ताकातील लॅक्टिक आम्लाची तांबे व पितळ या धातूंवर अभिक्रिया होते आणि त्यापासून विषारी क्षार बनतात.हे विषारी क्षार ताकात मिसळतात व ताक कळकते म्हणून तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ताक ठेवत नाहीत .तांबे -पितळ धातूंवर आम्लाची क्रिया होऊ नये म्हणून अशा भांड्यांवर कथलाचा थर देतात.म्हणजेच कल्हही करतात.कथलावर जरी आम्लाची अभिक्रिया झाली तरी त्यापासून बनलेले क्षार विषारी नसतात.

October 11, 2022

भाजी चिरल्यावर का धूत नाहीत ?


भाजी चिरल्यावर का धूत नाहीत ?


भाजीमध्ये असणारी ब आणि क जीवनसत्वे पाण्यात विद्राव्य असतात.भाजी चिरल्यावर धुतल्यास त्यातील ब आणि क जीवनसत्वे पाण्यात विरघळतात.भाजी चिरण्याअगोदर भाजी स्वच्छ धुवून घ्यावी.म्हणजे ब आणि क जीवनसत्वे सुरक्षित राहतील.अन्यथा ब आणि क जीवनसत्वाअभावी होणारे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतील .