September 3, 2025

प्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे उद्गार

 प्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे उद्गार 

माझे खरे मोठेपण  मी मारलेल्या चाळीस  लढायांत नसून  तयार केलेल्या  कायदासंहितेत आहे.

- नेपोलियन 


रुसो जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती.

- नेपोलियन 


तुम्हांस जर एक वर्षाची बेगमी करावयची असेल तर धान्य पेरा ; शंभर वर्षाची बेगमी करावयची असेल तर माणसे पेरा.

- कर्मवीर भाऊराव पाटील


करा किंवा मरा.( Do or Die.)

- महात्मा गांधी 


स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ! 

 -- लोकमान्य टिळक 


लोकसंख्यावाढ हा राष्ट्राच्या प्रगतीतील फार मोठा अडसर आहे.

- र.धों.कर्वे 


जय जवान , जय किसान .

- लालबहादूर शास्त्री 


सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर .

- महात्मा गांधी 


 लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या.

-वि .दा.सावरकर 


"तुम मुझे खून डो ,मै तुम्हे आझादी दूँगा"

 - नेताजी सुभाषचंद्र बोस 


माझ्या रक्ताचा एक थेंब देशाचे स्वातंत्र्य आणि एकता यांचे रक्षण करील.

- इंदिरा गांधी 


हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे,तितकीच ती अस्पृश्यांची आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 

मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही.

 -- डॉ.बाबासाहेब आंबेडकर 


वेदांकडे परत चला. 

- स्वामी दयानंद सरस्वती 


घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे पूर्णतः अनुपालन झाले तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग होईल.

 - न्या.एम.सी.छगला


अस्पृश्यता पळणे हा परमेश्वराविरुद्ध व मानवतेविरुद्ध केलेला गुन्हा आहे.

 - महात्मा गांधी 


सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!

 - लोकमान्य टिळक 


पन्नास वर्षे ! ब्रिटीश राज्य तोवर टिकेल तर ना ?

  स्वा.सावरकर 


चलो दिल्ली ! 

-- सुभाषचंद्र बोस 


चळवळ करा ; चळवळ करा , अखंड चळवळ करा .

 - दादाभाई नौरोजी 


ज्यांना बाटायचे नसेल त्यांनी माझा कित्ता गिरवावा.

 - मंगल  पांडे 

 

मी इंग्रज सत्ता मानीत नसल्याने मी बंद केले असे म्हणताच येत नाही.

-- तात्या टोपे 


असे महापुरुष मारत नसतात, त्यांच्या कार्याच्या रूपाने ते अमर झालेले असतात.

 महात्मा गांधींनी टिळकांबद्दल असे उद्गार काढले 


लोकमान्य टिळकांइतकीच शिक्षा मिळण्याचा मान मिळाला हा मी माझा बहुमान समजतो.

  -- महात्मा गांधी

 

मी भाकरी मागायला आलो आणि माझ्या पदरात दगड टाकले ..

-- महात्मा गांधी 


भारत मुक्त झाला की मानवता मुक्त झालीच.

 -- नेताजी सुभाषचंद्र बोस 


भारतातील उच्चवर्णीय भौतिक आणि नैतिकदृष्ट्या मृत असून आपल्याला फक्त बहुजन समाजाकडून अपेक्षा आहेत.

 - स्वामी विवेकानंद 


जिच्या हाती पाळण्याची दोरी , ती जगाते उद्धरी..

- महात्मा फुले 


विद्येविना मती गेली ,मतीविना नीती गेली 

नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले 

वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले 

- ( शेतकऱ्याचा आसूड )


सर्वसाक्ष जगत्पती , त्याला नाकोच मध्यस्थी .

- सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य 


शिका,संघटीत व्हा , संघर्ष करा.

- डॉ.बाबसाहेब आंबेडकर 


जर माझ्या मनात द्वेष असता आणि सुडाची भावना  असती तर पाच वर्षाच्या आत मी देशाचे वाटोळे केले असते .

--डॉ.बाबासाहेब आंबेडकर 


देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे.

-- डॉ.बाबासाहेब आंबेडकर 


इष्ट असेल ते बोलणार , साध्य असेल ते करणार .

- गो,ग.आगरकर 


भित्रे लोक त्यांच्या मरणापूर्वीच अनेक वेळा मारतात.

--शेक्सपिअर

 

देश आपल्यासाठी काय करील हे विचारू नका , तुम्ही देशासाठी काय करणार ते आधी सांगा.

-जॉन एफ केनेडी 


जय जवान , जय किसान , जय विज्ञान ! 

- अटलबिहारी वाजपेयी